गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 जुलै 2021 (20:00 IST)

बॅचलर्स पार्टीने केला घात

लखनऊ उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये मंगळवारी रात्री बॅचलर्स पार्टीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्याच्या मित्रांनी हत्या करून त्याचा मृतदेह रुग्णालयाबाहेर सोडून पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
 
साहिबाबादमधील लाजपतनगर येथे राहणारा तरुण सूरज राय मंगळवारी रात्री आपला मित्र हिमांशुच्या घरी गेला होता. हिमांशू यांचं बुधवारी लग्न होणार होतं. यामध्ये हिमांशू, सूरज, हरिओम, विक्की आणि काही अन्य मित्र सामील झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बॅचलर्स पार्टीमध्ये सर्वांनी खूप दारू प्यायली. यामध्ये त्यांच्यात काहीतरी गोष्टींवरून वाद झाला व त्यात बंदुकीची गोळी चालवण्यात आली. ही गोळी सूरजच्या पोटात लागली. तो जागेवरच तडफडू लागला. हिमांशू आणि त्याच्या इतर मित्रांनी जखमी अवस्थेत सूरजला मॅक्स रुग्णालयातील आपात्कालीन विभागात सोडून पळ काढला. तेथेच सूरजचा मृत्यू झाला.