शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2018 (15:10 IST)

तीन राज्यांमध्ये निवडणुका जाहीर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर

पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आता  यामध्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड  तीन राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात  त्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारी रोजी  मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या सर्व राज्यातील मतांची  तीन मार्चला मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एके ज्योती यांनी ईशान्येकडील तीन राज्य - मेघालय, नागालँड आणि त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तर या छोट्या राज्यातील तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागांवर मतदान होणार आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर मतदानावेळी होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएम मशीन वरील वाद होनार नाही असे दिसते आहेत.  निवडणुकांची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली आहे.