सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (13:23 IST)

मोदी ताजमहलही विकतील : राहुल

देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व काही विकायला काढले आहे. काय सांगावे कदाचित ते ताजमहलही विकतील, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर केली. दिल्लीच्या जंगपुरा येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी ही टीका केली. 
 
आजकाल भाजपचे नेते देशभक्तीच्या बर्‍याच गप्पा मारत आहेत. सकाळ-संध्याकाळ पाकिस्तानच्या नावाने खडे फोडत आहेत. पाकिस्तानात जाऊन भारताता की जय म्हणण्याची हिंमत   दाखवणारा एक तरी भाजपचा नेता मला दाखवा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.