बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 मार्च 2020 (09:58 IST)

कमलनाथ सरकारची शक्तिपरीक्षा होणार की नाही ?

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडली त्याचवेळी त्यांच्या २२ समर्थक आमदारांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत. यात सहा मंत्रीही होते. त्यामुळे मध्यप्रदेशमधील मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकार अडणीत आलेत. तर दुसरीकडे विधानसभेतील अभिभाषणानंतर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडावा, असे निर्देश मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना दिले आहेत. मात्र, ठरावाबाबत सोमवारीच निर्णय घेऊ, असे विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोमवारी कमलनाथ सरकारची शक्तिपरीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम असून, नवा सत्तासंघर्ष सुरू झाला आहे.
 
दरम्यान, काँग्रेसच्या २२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे पाठवले आहेत. या आमदारांनी आपल्याकडेही १० मार्चला स्वतंत्र पत्रे पाठवली असून, सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडावा़, असे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना शनिवारी रात्री दिले. त्याचेवेळी विश्वासदर्शक ठराव मांडण्यास परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय सोमवारीच जाहीर करण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी रविवारी सांगितले. त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.