शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑगस्ट 2024 (12:45 IST)

आईने ब्लेडने वडिलांचा प्रायव्हेट पार्ट कापून हत्या केली, 9वीत शिकणाऱ्या मुलीने उघड केले खुनाचे रहस्य

दोन वर्षांपूर्वी एक महिलेने आपल्या पतीची हत्या केली. आतापर्यंत मर्डर केस पोलिसांसाठी मिस्ट्री राहीले. परंतू आता 9वीत शिकणाऱ्या मुलीने तिच्या आईचे गुपित पोलिसांसमोर उघड केले. मुलीच्या जबाबाच्या आधारे पिथौरागढ सत्र न्यायालयाने महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने 50 हजार रुपये दंड किंवा अतिरिक्त 5 वर्षांच्या कारावासाची तरतूद केली आहे.
 
लहान भावाला संशय आला
14 फेब्रुवारी 2022 रोजी पूरण राम यांनी महसूल पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या 40 वर्षीय वहिनी सुनीता देवी हिच्यावर पती जितेंद्र रामचा जीव घेतल्याचा आरोप केला होता. जितेंद्र आणि सुनीता पिथौरागढच्या डिगास गावात राहत होते. तर पूरण राम हे दुसऱ्या गावातील रहिवासी होते. 12 फेब्रुवारीच्या रात्री त्यांना त्यांचा भाऊ जितेंद्र यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. पूरण राम जेव्हा डिगास गावात पोहोचला तेव्हा त्याला जितेंद्रच्या कपड्यांवर आणि आजूबाजूच्या परिसरात रक्ताच्या थारोळ्या असल्याचं दिसलं. हे पाहून पुरणला संशय येऊ लागला.
 
मुलीने काकांना हकीकत सांगितली
पुरण सांगतात की, नंतर जितेंद्रच्या 15 वर्षांच्या मुलीने त्याला हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली. मुलीने पूरणला सांगितले की, वडील रात्री कामावरून घरी परतल्यावर आई आणि वडिलांमध्ये काही गोष्टीवरून भांडण सुरू झाले. मुलीच्या म्हणण्यानुसार, सुनीताने दरवाजा बंद केला आणि जितेंद्रला बेदम मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात सुनीताने पतीचा प्रायव्हेट पार्ट ब्लेडने कापला. मुलगी खिडकीतून सगळं पाहत होती. ती वारंवार आईला दरवाजा उघडण्याची विनंती करत होती मात्र आईने दरवाजा उघडला नाही. मुलीचे म्हणणे आहे की वडिलांचे इतके रक्त वाहून गेले की त्यांचा मृत्यू झाला.
 
न्यायालयात साक्ष दिली
पूरणला हत्येची कहाणी सांगितल्यानंतर मुलीनेही पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. मुलीनेही न्यायालयात आईविरुद्ध साक्ष दिली. चौकशीदरम्यान सुनीतानेही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सुनीताने गुन्ह्याची कबुली दिली असून तिने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचे सांगितले, त्यामुळे पतीचा मृत्यू झाला. हत्येनंतर सुनीताने झाडीत ब्लेड फेकले. तपासादरम्यान पोलिसांनी ब्लेड जप्त केले.
 
न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला
पिथौरागढ सत्र न्यायालयाने ही भयावह कथा ऐकल्यानंतर 23 जुलै 2024 रोजी निकाल दिला. न्यायालयाने सुनीताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने सुनीताला 50 हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. सुनीताने दंड न भरल्यास तिला आणखी 5 वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो.