शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 4 मार्च 2020 (14:51 IST)

... म्हणून मोदी यंदा होळी साजरी करणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा होळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 
 
करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे. तज्ञांनी नरेंद्र मोदींना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाण्याचं टाळण्याचा सल्ला दिला आहे. यामुळेच नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण होळीच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे.
 
नरेंद्र मोदी यांनी एक पोस्टर ट्विट केलं. यामध्ये स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात आली आहे.