रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2017 (09:16 IST)

नावात सेना, फौज असलेल्या पक्षांची मान्यता रद्द करा

नावात सेना किंवा फौज आहे, अशा पक्षांची मान्यता रद्द करा, अशी मागणी काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ट्विट करुन ही मागणी केली आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येने तीव्र दु:ख झालं आहे. त्यांना तातडीने न्याय मिळेल अशी आशा आहे, असं मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर त्यांनी  ट्विट करुन कट्टरतावाद्यांना लक्ष केलं आहे. गौरी लंकेश यांनी उजव्या विचारणीच्या कट्टरतेविरोधात आवाज उठवला होता. हाच धागा पकडून मिलिंद देवरा यांनी उजव्या विचारसरणीच्या पक्षांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी थेट सेना किंवा फौज अशी नावं असलेल्या पक्षांची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली आहे.