शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (16:40 IST)

नवीन संसद इमारतीवरील विशाल अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदींनी अनावरण केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन संसद भवनाच्या छतावरील विशाल अशोक स्तंभाचे अनावरण केले. हे अशोक स्तंभ 9500 किलो वजनासह कांस्यपासून बनवलेले आहे आणि त्याची उंची 6.5 मीटर आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी ही रचना वेळेवर तयार करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला. पीएमओच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधानांनी नवीन संसदेच्या कामात सहभागी असलेल्या 'कार्यकर्त्यां'शी बोलले आणि त्यांच्या आरोग्याची आणि प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी उपस्थित होते.
blockquote class="twitter-tweet">

Delhi | PM Narendra Modi unveiled the 6.5m long bronze National Emblem cast on the roof of the New Parliament Building today morning. He also interacted with the workers involved in the work of the new Parliament. pic.twitter.com/sQS9s8aC8o

— ANI (@ANI) July 11, 2022 <
नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय बोधचिन्ह बसवण्याचे काम आठ वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण करण्यात आले. हे क्ले मॉडेल बनवण्यापासून ते संगणकीय ग्राफिक्स तयार करणे आणि कांस्य आकृत्यांचे पॉलिशिंग पर्यंत आहे. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत संसदेच्या नवीन इमारतीसह इंडियागेट जवळ 10 इमारतींचे बांधकाम होणार आहेत. या अंतर्गत 51 मंत्रालयाचे कार्यालय असणार. नवीन संसद बनवण्याचे काम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड यांना देण्यात आले आहे. संसद भवनाला 100 वर्ष पूर्ण होणार असल्यामुळे  नवीन संसद इमारतीचे बांधकाम करण्यात आले.
 
लोकसभेचे अध्यक्ष म्हणाले की नवीन संसद भवन ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 पर्यंत वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. यावर्षी संसदेच्या नवीन इमारतीत हिवाळी अधिवेशन घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. बांधकामाच्या वेळेत फक्त सात दिवसांचे अंतर आहे, जे भरून काढता येईल. आम्ही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरचा अंदाज दिला होता आणि मला आशा आहे की यंदा 2022 चे हिवाळी अधिवेशन नवीन ग्रीन बिल्डिंगमध्ये होईल.