शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

नाना पाटेकर आणि गडकरी यांचा व्हिडिओ बनू शकतो भाजपच्या गळ्याचा फास

मुंबई- केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची एका टीव्ही चॅनलला दिलेली मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नाना पाटेकरही त्यांच्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओत गडकरी म्हणत आहे की आमचा एवढा दृढ विश्वास होता की राज्यात आमची सत्ता येणार नाही म्हणून पक्षातील लोकं म्हणायचे वादा करायला काय हरकत कोणती जबाबदारी येणार आहे. पण आता सत्ता मिळाली आणि म्हणून लोकं जवाब मागतात तर मग काय आम्ही हसतो आणि पुढे जातो...
 
व्हिडिओवर राहुल गांधींचे ट्विट 
व्हिडिओ राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल यांनी ट्विट केले की गडकरी खरं बोलले. जनता हाच विचार करत आहे की सरकारने स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्या स्वप्नांचा आणि अपेक्षांचा बळी घेतला. या व्हिडिओवर भाजपकडून प्रतिक्रिया आलेली नाही.


गडकरी यांच्या इंटरव्यू काही दिवसांपूर्वी एका मराठी चॅनलवर दाखवण्यात आला होता. यात त्यांच्या बाजूला नाना पाटेकर दिसून येत आहे.