रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (10:32 IST)

केंद्रीय शाळेत प्रवेश घेण्याची संधी, 1 मार्च पासून सुरू होईल नोंदणी

सेंट्रल स्कूल ऑर्गनायझेशन (केव्हीएस) ने 2019-20 सत्रात प्रवेशासाठी अधिसूचना जारी केली आहे. केव्हीएस शाळांमध्ये प्रथम वर्गासाठी ऑनलाईन नोंदणी 1 मार्च पासून सुरू होईल. नोंदणी 19 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत होऊ शकेल. 
 
26 मार्च रोजी प्रथम यादी जाहीर केली जाईल. दुसरी यादी 9 एप्रिल रोजी सोडली जाईल. दुसऱ्या यादीनंतर देखील जागा रिक्त राहिल्या तर तिसरी यादी 23 एप्रिल रोजी सोडली जाईल. अर्ज प्रक्रियेत 19 मार्चपर्यंत पुरेशी अर्ज नाही आल्यावर 30 मार्च पासून पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्याचे प्रवेश 8 एप्रिल पासून होतील. जागा रिक्त असल्यास द्वितीय किंवा पुढल्या वर्गात अर्ज प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू होईल. 
 
अकरावी वर्ग व्यतिरिक्त द्वितीय आणि इतर वर्गांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपासून सुरू होईल आणि 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालू राहील. अर्जदार सेंट्रल स्कूलच्या वेबसाइट http://kvsangathan.nic.in वर प्रवेशाबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकतात. अधिसूचनेनुसार, 11व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अर्ज 1 जुलैपासून सुरू होईल.