गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (15:59 IST)

पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, बहिण भावाचा खून, प्रकरणाचे गूढ वाढले

मुंबई येथे मोठी घटना समोर आली आहे. एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने तिच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. या गंभीर प्रकरणी पोलीस अधिकारी अनिल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून, आरोपी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने मागील 12 वर्ष अत्याचार करत वारंवार गर्भपात केल्याचा आरोप तिने केला आहे. या महिलेचा व्हिजा वाढवून देण्याच्या निमित्ताने 2003 मध्ये आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधवशी ओळख झाली होती, पीडितेने म्हटलं आहे. आरोपीने ओळख झाल्यानंतर गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार केला. माझ्या मुलाला आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
 
बहिण भावाचा खून करुन पुण्यात मृतदेह गाडले
 
आरोपी पोलीस अधिकारी जाधवने एका तरुणीचा सोबतच तिच्या भावाचा खून माझ्या समोर केला आणि त्या बहिण भावाचे मृतदेह पुण्यात एका ठिकाणी पुरून टाकले असा खळबळ माजवणारा आरोप तिने केला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं असून, तिचे वकील नितीन सातपुते यांनी माध्यमांना या प्रकरणाची सविस्तर सांगितली आहे. आरोपी पोलीस अधिकारी अनिल जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी ज्योत्स्ना जाधव यांचा पती आहेत, त्यामुळे या प्रकरणात काही राजकीय दबाव येणार का हेही पाहावे लागणार आहे. मात्र या गंभीर आरोपामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.