1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (10:53 IST)

गोमांस खाण्यात काही गैर नाही असं सावरकरांनी लिहून ठेवलंय - दिग्विजय सिंग

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी गाय आणि सावरकरां वरून केलेल्या एका वक्तव्यानं पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
गायीला हिंदू धर्मात मातेचा दर्जा असला, तरी गाय ही आपली माता असूच शकत नाही. त्यामुळं गोमांस खाण्यात काहीच चुकीचं नाही, असं सावरकरांनी पुस्तकात लिहिलं आहे, असा दावा दिग्विजय सिंग यांनी भोपाळमध्ये केला आहे.
काही पुस्तकांचा दाखला देत दिग्विजय सिंग यांनी ही वक्तव्यं केली. काही हिंदू गोमांस खातात आणि ते खाऊ नये असं कुठं लिहिलं आहे का? असं विचारत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
 
हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांचा आपसांत काही संबंध नसल्याचंही सावरकरांना एका पुस्तकात म्हटलं असल्याचं सिंग यांनी यावेळी म्हटलं आहे.