बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2024 (13:14 IST)

Solapur:खोड्या करतो म्हणून बापानेच मुलाला संपवले

murder
लोक मुलांसाठी काहीही करतात. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. असं म्हणतात की बापाचं मुलांसाठी काही वेगळंच नातं आहे. आपल्या मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी वडील राब राब राबतात. पण एका बापाने आपल्या पोटच्या मुलाला ठार मारण्याची घटना सोलापुरात घडली आहे.

याचे कारण काय तर मुलगा सतत खोड्या कार्याचा , मोबाईल बघायचा, अभ्यास नाही करायचा. एवढ्या कारणामुळे एका बापाने आपल्याच मुलाला संपविले. विजय सिद्राम बट्टू असे या आरोपी पिताचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.   
 
मुलगा सतत खोड्या करायचा, मोबाईल मागायचा आणि अभ्यास करत नव्हता या कारणामुळे विजय ने आपल्या 14 वर्षाच्या मुलाला जीवे मारले. तुळजापूर रोडवर पोलिसांना एका १४ वर्षाच्या मुलाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. 28 जानेवारी रोजी आरोपी विजयचे पत्नीशी भांडण झाले आणि तेव्हा त्याने मुलाला मारल्याचे म्हटले.

पत्नीने त्याची तक्रार पोलीसात केली असून पोलिसांनी चौकशी करत विजयला अटक केली. सुरुवातीस त्याने बनवा-बनवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी सक्ती केल्यावर त्याने मुलाचा खून केल्याचे काबुल केले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोलापूर या घटनेने हादरलं आहे.  

 Edited by - Priya Dixit