सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (12:05 IST)

सोनू सूदने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली

अभिनेता सोनू सूदने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या बैठकीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही त्यांच्या सोबत होते.
 
केजरीवाल म्हणाले की, सोनू सूद देशाच्या मेंटोर कार्यक्रमासाठी आमचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्यास सहमत झाले आहे.ते म्हणाले आहे की ते काही मुलांचे मेंटोर ही बनतील. अभिनेता सोनू सूद म्हणाले की,आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
 
ते म्हणाले की, आज दिल्ली सरकारने देशाच्या मेंटोरसाठी एक व्यासपीठ बनवले नाही, तर देशासाठी काहीतरी करण्यासाठी आपल्याला एक व्यासपीठ बनवले आहे.जर आपण एक तरी मुलांना योग्य दिशा देता तर हे देशासाठी मोठं योगदान ठरेल.
 
एक दिवस आधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनात म्हटले होते की, त्यांचे सरकार देशातील सर्वात प्रगतीशील चित्रपट धोरण घेऊन येईल, ज्यामुळे मनोरंजन उद्योगाला चालना मिळेल.
 
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी कोविड -19 साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान, 47 वर्षीय या अभिनेत्याने स्थलांतरित मजुरांना खूप मदत केली होती, ज्यामुळे देशभरात त्यांचे कौतुक झाले. साथीच्या दुसऱ्या लाटेतही त्यांनी लोकांना खूप मदत केली.