बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 4 जानेवारी 2025 (12:36 IST)

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या मुलीचा अपघात, ट्रकने कारला दिली धडक

Former cricketer Sourav Ganguly news: भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या मुलीचा अपघात झाला आहे. कोलकाता येथे एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली. अपघाताच्या वेळी त्यांची मुलगी कारमध्ये उपस्थित होती, पण सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
 
मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या मुलीच्या कारला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोलकात्याच्या डायमंड हार्बर रोडवरील बेहाला चौरस्ता परिसरात त्यांच्या कारला अपघात झाला. एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली. अपघाताच्या वेळी सौरव गांगुलीची मुलगी कारमध्ये उपस्थित होती आणि कार तिचा चालक चालवत होता. घटनेनंतर ट्रकचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण तो पकडला गेला आहे. . ही संपूर्ण घटना शुक्रवारी संध्याकाळची असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरव गांगुलीच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाला. तसेच सौरव गांगुलीच्या कारला ट्रकने धडक दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघाताच्या वेळी सौरव गांगुलीची मुलगी आणि त्याचा ड्रायव्हर कारमध्ये उपस्थित होते. या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. कारमधील दोघेही सुखरूप असून ते थोडक्यात बचावले. सध्या पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.