बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी माजी नियुक्ती झाल्याचं वृत्त खोटं- सुषमा स्वराज

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं वृत्त खोटं असल्याचं स्वत: सुषमा यांनी ट्विट करत खंडन केलं आहे. 
 
केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबद्दल ट्विट केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यांनी सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केलं होतं. हर्षवर्धन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये राज्यपाल झाल्याबद्दल स्वराज यांचं अभिनंदन केलं होतं. 'भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माझ्या ताई, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वच क्षेत्रात तुम्हाला असलेल्या अनुभवाचा जनतेला फायदा होईल,' असं हर्षवर्धन यांनी ट्विट केलं होतं.
 
परंतू डॉ. हर्षवर्धन यांच्या ट्विटनंतर तासाभरानं सुषमा स्वराज यांनी ट्विट करत या वृत्ताचं खंडन केलं. सुषमा स्वराज मोदी सरकार एकामध्ये परराष्ट्र मंत्री होत्या. मात्र सध्याच्या मोदी सरकारात त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही.