मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (22:08 IST)

Tata Steel Plant Blast: टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट झाला असून त्यामुळे प्लांटमध्ये भीषण आग लागली

Tata Steel Plant Blast Latest Update: झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट झाला असून त्यामुळे प्लांटमध्ये भीषण आग लागली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांची माहिती घेतली.
 
सीएम हेमंत सोरेन यांनी ट्विट केले की, जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोट झाला आहे. जखमींवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासन टाटा स्टील व्यवस्थापनाच्या समन्वयाने कारवाई करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्लांटमध्ये आग आणि गॅस गळती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. स्फोटानंतर आग इतकी वेगाने पसरली की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना सकाळी 10.20 वाजताची आहे. ही आगीची घटना IMMM कोक प्लांटच्या बॅटरी क्रमांक 6 आणि 7 मध्ये घडली.