मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 31 डिसेंबर 2024 (18:15 IST)

महाकाल नगरी उज्जैनमध्ये भीषण अपघात, 3 ठार तर 14 जखमी

Ujjain News : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात आज एक भीषण रस्ता अपघात झाला ज्यामध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले. पिकअप वाहन भरधाव वेगाने रस्त्यावरून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पिकअप वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार पिकअपमध्ये 24 जण होते आणि ते मजुरांसह रतलामला जात होते. वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचा पिकअपवरील ताबा सुटला, त्यामुळे वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अशी माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.