मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (17:07 IST)

यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस देशात होणार, हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

rain
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार भारतवासियांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस देशात होणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. सामान्य स्वरुपाच्या या पावसामुळे देशातील शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळणार आहे.मान्सून हा भारताचा अर्थमंत्री असल्याचे समजले जाते. त्यामुळेच मान्सूनच्या अंदाजाकडे संपूर्ण भारतवासियांचे लक्ष लागून असते.

हवामान विभागाकडून एप्रिलमध्ये पहिला अंदाज दिला जातो. त्यानंतर मेच्या अखेरीस एक अंदाज दिला जातो आणि जून महिन्यात अंतिम अंदाज वर्तविला जातो. गेल्या काही वर्षांपासून भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजाने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.