सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (15:23 IST)

माकडानीही केली पतंगबाजी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सोशल मीडियावर माकडाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आनंदाने पतंग उडवताना दिसत आहे.जे पाहून लोकांना आश्चर्य होत आहे. 
 
14 जानेवारी रोजी संपूर्ण देशवासीयांनी मकर संक्रांतीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला . मकर संक्रांतीच्या दिवशी गुजरात आणि राजस्थानसह भारतातील सर्व राज्यांमध्ये पतंग उडवण्याची परंपरा आहे, परंतु केवळ माणसांनी नाही तर माकडांनीही पतंग उडवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.  सध्या सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पतंग उडवताना दिसत आहे .
 
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकड छताच्या टाकीवर बसले आहे आणि मांजा धरून पतंग उडवत आहे. पतंग कापल्यावर मांजा त्याच्याकडे आला. मग काय, माकड उडू लागले. तो मांजा ओढू लागला. आणि  पतंगबाजीचा आनंद लुटू लागला. आकाशात अनेक पतंग उडत होते, तोही पतंग उडवू लागला. मग त्याने पतंग आपल्या दिशेने ओढला आणि पतंग फाडला.