1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (16:31 IST)

अनियंत्रित कारने दोन महिलांना चिरडले, तरुण जखमी, आरोपी कार चालकाला अटक

राजस्थानच्या उदयपूरमध्ये झालेल्या अपघातामुळे नवीन वर्षाची सुरुवात दुःखद  झाली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यात आणखी एक तरुण जखमी झाला. वेगाने धावणारी कार अनियंत्रित होऊन  हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , हा अपघात उदयपूर शहरातील अंबामाता पोलीस स्टेशन परिसरात झाला. शहरातील मल्ला तलाई चौकाजवळ रामपुरा बाजूकडून ही कार अनियंत्रित वेगाने येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारने प्रथम दुचाकीला धडक दिली. यानंतर भाजीविक्री करणाऱ्या महिलेला पायदळी तुडवत ती दुभाजकावर चढली. 
या अपघातात  दुचाकी वर असलेल्या जखमी तरुणावर उपचार सुरू असून या अपघातात दुचाकीवर तरुणांसोबत बसलेली महिला कहकशां  शेख आणि भाजीविक्री करणारी महिला कालीवासातील सविता मीना यांचा जागीच मृत्यू झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत महिलांच्या मृतदेहाचे एम बीच रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे. आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.