गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (11:10 IST)

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला, राहुल गांधींनी केला सवाल

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज वर्ष पूर्ण होतंय. या घटनेत सीआरपीएफ 40 जवान शहीद झाले होते. देशभरात शहीद जवानांचं स्मरण केलं जात आहे. अशात काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही शहिदांना श्रद्धांजली वाहिलीय. परंतु, सोबतच त्यांनी मोदी सरकारला काही प्रश्नही विचारलेत. 
 
राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत प्रश्न विचारलेत. 'आज जेव्हा आपण सगळे पुलवामा हल्ल्यातील ४० शहिदांचं स्मरण करत आहोत, तेव्हा आपल्याला हेदेखील विचारायला हवं...
 
१. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला झाला?

२. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत काय आढळलं?
 
३. सुरक्षेतील ढिसाळपणाबद्दल मोदी सरकारमध्ये कुणाला जबाबदार धरण्यात आलं?
 
उल्लेखनीय आहे की यापूर्वी सीपीआयकडून देखील पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी मोदी सरकारवर निशाणा साधला गेला होता. तरी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सेनेनं याचा 'बदला' घेत पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले करत बालाकोट स्ट्राईक घडवून आणली होती. यानंतर देखील मोदी सरकारावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सेनेचा वापर करण्याचे आरोप देखील करण्यात आलेत.