गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हनीमूनवर कळलं पत्नी ‘ती’ नसून ‘तो’ आहे

मुंबई - गोवंडी पोलिसाकडे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका मुलाने आरोप केले आहे की त्याने जिच्याशी लग्न केले ती मुलगी नसून मुलगा आहे. नंतर मुलाच्या कुटुंबाने मुलीच्या कुटुंबाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
गोवंडीच्या 21 वर्षाच्या तरुणाची त्याच्याच कॉलेजमधल्या एका तरुणीसोबत मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मुलीच्या कुटुंबाने काही मेडिकल कारणांमुळे मुलीला कधीही मुलं होऊ शकतं नाही असे सांगितले. तरी दोघांच्याही कुटुंबीयांच्या संमतीने लग्न लावून दिले.
 
मधुचंद्राच्या रात्री मुलीने हार्नियाचे ऑपरेशन झाल्यामुळे संबंध बनवण्यास टाळले. नंतर हनीमूनसाठी दोघे मनालीला गेले. तेथे मुलाने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर मुलगी वेगवेगळी कारणं देत टाळत राहिली. मात्र सत्य उघडकीस आले आणि कळलं की पत्नी ती नसून तो आहे. 
 
मुलीने व्हर्जिनोप्लास्टी झाल्याचेही मान्य केले. घडलेल्या प्रकारामुळे मुलाला जबरदस्त धक्का बसला. त्याला नैराश्यात बघून कुटुंबीयांनी कारण विचारले तर त्याने घडलेली सर्व हकिकत सांगितली. मुलीच्या घरच्यांना जाब विचारल्यास ते उलट मुलाला धमकावण्याचा प्रयत्न करू लागले. या विचित्र प्रकरणामुळे पोलिसदेखील गोंधळले आहेत.