गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (09:02 IST)

आधार कार्डवर कोणताही बदल करण झालं खर्चित, भरावे लागणार शुल्क

यापूर्वी आधार कार्डवर कोणताही बदल करावा असल्यास कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. परंतु आता आधार कार्डमध्ये कोणताही बदल करायचा असेल तर १०० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. याबाबत युआयडीआयएकढून सांगण्यात आले आहे. जर आपल्याला बायोमेट्रीकमध्ये बदल करायचा असेल तर ५० रुपये शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. आधार कार्डवर बदल करतेवेळी अर्जासोबत फी भरावी लागणार आहे. 
 
याचबरोबर आपले नाव, पत्ता किंवा जन्माची तारीख बदलण्यासाठी आपल्याला वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. आपल्याला आधार कार्ड काढतेवेळी स्वःताच्या ओळखीसाठी पुरावा म्हणून ३२ प्रकारची कागदपत्रे लागतात. तसेच रहिवाशी पुराव्यासाठी ४५ प्रकारची कागदपत्रे आणि जन्मतारखेचा पुरावा म्हणून १५ कागदपत्रे स्वीकारतात. आधार कार्ड काढण्यासाठी किंवा कोणताही बदल करण्यासाठी यातील एक पुरावा सादर करू शकतो.