Realme X ची लॉन्च डेट कंफर्म, Realme X यूथ एडिशन देखील सादर करण्यात येईल
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने आपला नवीन स्मार्टफोन Realme X ची लॉन्चिंगची तारीख घोषित केली आहे. कंपनीकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार Realme X 15 मे रोजी बीजिंग, चीन येथे आयोजित एका कार्यक्रमात लॉन्च होईल. Realme X व्यतिरिक्त कंपनी Realme X यूथ एडिशन देखील सादर करणार आहे. काही अहवालांनुसार रियलमी 3 प्रो हेच Realme X यूथ एडिशन म्हणून लॉन्च केलं जाईल.
रियलमीच्या अधिकृत Weibo हँडलवर फोन लाँच करण्याविषयी माहिती दिली आहे. चीनमध्ये Realme X साठी नोंदणी देखील सुरू झाली आहे. JD.com वरून फोन बुक केला जाऊ शकतो. बुक करणार्या प्रथम 100 ग्राहकांना रियलमी हेडफोन मोफत मिळेल.
* Realme X तपशील आणि किंमत - आतापर्यंत असलेल्या अहवालांनुसार Realme X मध्ये क्वेलकॉमला स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर मिळेल. या व्यतिरिक्त फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असेल. फोनसह VOOC 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5चे संरक्षण मिळेल. या फोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा असेल, ज्यात एक कॅमेरा 48 मेगापिक्सेल आणि दुसरा 5 मेगापिक्सेल असेल. Realme X च्या 6
जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,599 चीनी युआन अर्थात 16,500 रुपये असू शकते.