शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: जुन्नर , शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (18:40 IST)

पुणे जिल्ह्यात आढळले ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. करोना विषाणूचा ओमायक्रॉन हा  आतापर्यंतचा सर्वाधिक भयंकर प्रकार असून याचा प्रसार वेगाने होऊ शकतो अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात  ओमायक्रॉनचे 7 रुग्णआढळून आल्याने चिंता वाढली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या  रुग्णांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीत त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार या रुग्णांना कोणतीही लक्षणं जाणवत नाहीयेत.  या सातही रुग्णांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळालीआहे.