रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (17:50 IST)

पुण्यात धक्कादायक प्रकार, आई वडिलांनी 13 दिवसांच्या बाळाला खड्ड्यात पुरले

पुण्यातल्या सिंहगड रोड भागात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात आई वडिलांनी तेरा दिवसांच्या बाळाला पुरुन टाकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रोडवरील वडगा परीसरातल्या झाडांमध्ये या बाळाला पुरण्यात आलं. 
 
एका खड्ड्यात बाळाला पुरण्यात आले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. एका दाम्पत्याने १३ दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिला होता आणि ते बाळ दिव्यांग जन्माला आल्याने आई वडिलांनी त्याला जंगलात खड्डा खोदून पुरलं.