सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (08:33 IST)

पुणे मेट्रोच्या भूमिगत कामाचा एक महत्वपूर्ण टप्पा टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ स्थानकापर्यंत पोहचले

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेमधील शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 किमीचा मार्ग भुयारी असणार आहे. अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागातून जाणारा हा मार्ग शिवाजीनगर बस स्थानक, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी 3 टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येत असून त्यांनी आत्तापर्यंत 7 किमीचा (12 किमी पैकी) भुयारी मार्ग बनविला आहे. 2 टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्गाचे कामाचा प्रारंभ करण्यात आला होता, तर 1 टनेल बोरिंग मशीन स्वारगेट येथून मंडईच्या दिशेने काम करत आहे.
 
 कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्ग बनविणारे टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ येथे पोहचत आहे.आजमितीस सिव्हिल कोर्ट स्थानक पार करून मुठा नदीच्या खालून बुधवार पेठ येथे “मुठा” टनेल बोरिंग मशीन पोहचत आहे. पुणे मेट्रोच्या कामाचा हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. दुसरे टनेल बोरिंग मशीन ‘मुळा लवकरच बुधवार पेठ स्थानकात पोहचणार आहे.