पुण्यातील ससून रुग्णालयात 284 डॉक्टर्स आणि नर्सला कोरोनाची लागण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पुण्यातील ससून रुग्णालयाला मोठा फटका बसला आहे. येथे डॉक्टर्स आणि नर्ससह 284 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण आल्याचे दिसून येत आहे.
यापैकी अधिकाधिक रुग्ण कोणतीही लक्षणे नसलेले आहेत. तरी ससून रुग्णालयातील विविध विभागांमध्ये कर्मचारी कमी पडत आहेत. पुणे जिल्ह्यातील ससून रुग्णालय हे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तसेच गरिबांच्या उपचारासाठी महत्त्वाचे मानले जाते.
दरम्यान, कोरोनाचे नियम पाळले नाहीत तर कठोर निर्बंध लावण्यात येतील असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.