बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:44 IST)

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा ससून रुग्णालयात दाखल

Pradeep Sharma
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात त्यांची प्रकृती बिघडली आहे. मनसुख हिरेन खून प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा यांच्या पोटात गेल्या काही दिवसांपूर्वी पोटात दुखत होते. पोटात सतत दुखत असल्यामुळे शर्मा यांना सुरक्षेच्या दृष्टीने ससून रुग्णालात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची सोनोग्राफी करण्यात येणार आहे. तसेच, पुढील उपचारासाठी शर्मा हे सध्या ससूनमध्ये आहेत.
 
दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान म्हणजेच अँन्टिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. सध्या प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत.
 
मुंबई पोलिस दलात कार्यरत असताना त्यांच्यावर आतापर्यंत 113 एन्काऊंटरची नोंद आहे. प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मधून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता