शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 19 जुलै 2022 (14:52 IST)

मुलीला शाळेत सोडायला जाताना झालेल्या अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

पुण्यातील हडपसर परिसरात सासवड मार्गाने शाळेत सोडायला चाललेल्या बाप लेकीच्या दुचाकीला हडपसर सासवड मार्गावरील ग्लायडिंग सेंटर समोर ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार बाप लेकीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात निलेश साळुंखे (35 रा.ढमाळवाड़ी,फुरसुंगी)मीनाक्षी साळुंखे(10 वर्षे) असे मृत्युमुखी झालेल्या बाप लेकीचे नाव आहे. 
 मिळालेल्या माहितीनुसार, मीनाक्षी इयत्ता पाचवीत शिकल्या होती. दररोज प्रमाणे तिला शाळेत सोडायला वडील निलेश हे दुचाकीवरून निघाले असता सात वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर समोर एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात निलेश हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मीनाक्षी हिला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी ट्रक चालक दिलीप कुमार पटेल(रा. मध्यप्रदेश) याला अटक केली आहे.