शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (08:03 IST)

रिक्षात विसरली 3 लाखाची रोकड व 55 हजारांच्या साड्या, डेक्कन पोलिसांनी घेतला तात्काळ शोध

लग्नाची खरेदी करण्यासाठी पुण्यात आलेल्या एका कुटुंबाची तीन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग आणि 55 हजारांच्या साड्यांची बॅग रिक्षात विसरली .खरेदी केलेले सामान आणि रोख रक्कम गेल्याने कुटुंबाने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सर्व हकीकत सांगितल्यानंतर डेक्कन पोलिसांनी  तात्काळ रिक्षा चालकाचा शोध घेऊन रिक्षात विसरलेले सामान आणि रोख रक्कम कुटुंबाच्या स्वाधिन केले.

विश्वजीत दिलीपराव पवार आणि त्यांचे मित्र पंकज माणिकराव जमदाडे (रा. मणेराजुरी ता. तासगाव, जि. सांगली) हे लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी  पुण्यात आले होते. खरेदी केल्यानंतर जंगली महाराज रोड येथील हॉटेल शिवसागर येथे कुटुंबासोबत नाष्टा करण्यासाठी थांबले होते. हॉटेलमध्ये जाताना त्यांची तीन लाख रुपये  असलेली पैशाची बॅग आणि 55 हजार रुपयांच्या साड्यांची बॅग  रिक्षात विसरली.

विश्वजीत पवार यांनी रात्री 8 वाजात त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसाकडे  तक्रार देली. डेक्कन पोलिस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार दादासाहेब बर्डे  व महेश तांबे  यांनी डेक्कन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या  हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाचा क्रमांक मिळवला. नाकाबंदी अ‍ॅप वरुन रिक्षाचालकाचे नाव व पत्ता घेतला असता रिक्षा चालक सुदेश घोलप (रा. गणेश मंदिर, घोरपडी बाजार) असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी तात्काळ रिक्षा चालक राहत असलेल्या ठिकाणी जाऊन सुदेश घोलप यांच्याकडून रिक्षात विसरलेल्या साड्या व रोख रक्कम ताब्यात घेतली.हे सर्व सामान डेक्कन पोलीस ठाण्यात आणून रात्रगस्त अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पावसे  यांच्याहस्ते तक्रारदार यांच्याकडे देण्यात आले.