शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (15:59 IST)

पुण्यासाठी गडकरी यांनी इथेनॉल प्लॅन घोषीत केला

प्रदूषण मुक्त पुण्यासाठी केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल प्लॅन घोषीत केला आहे. तसेच पुणे - बंगळुरु द्रृतगती मार्गाची गडकरी यांनी घोषणा केली आहे.वाघोली ते शिरुर महामार्गही तीन मजली करणार असल्याचे ते म्हणाले.पुण्यात आज नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातल्या उड्डाण पुलाचे भूमीपूजन पार पडले.त्यावेळी ते बोलत होते. 
 
पुणे मेट्रो कामाच्यावेळी लोकांनी माझ्यावर बरीच टीका केली,असे यावेळी गडकरी म्हणाले. पुणे मेट्रोचं काम सुरू झालं नाही आणि नागपूरचे काम बरंच पुढे गेले,तेव्हा पुण्यातल्या लोकांनी माझ्यावर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका केली.त्यावेळी मी पुण्यात आलो होतो.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. पुण्यात मेट्रो अंडरग्राऊंड किंवा वरून करायची यावर चर्चा झाली.तेव्हा मी म्हटले जेवढा खर्च जास्त करू तेवढे तिकिटाचे दर वाढतील. त्यामुळे मेट्रो वरूनच करण्याचा निर्णय झाला,असे गडकरी म्हणाले.
 
दरम्यान, पुणे कोल्हापूर मेट्रो प्रवासामुळे वेळ, पैशांची बचत होऊ शकते.त्यामुळे एसटीच्या तिकिट दरात पुणे ते कोल्हापूर मेट्रो प्रवास शक्य आहे.पुढील काळात हा मेट्रो मार्ग होऊ शकेल,असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी मेट्रो हाच आपल्याकडे पर्याय आहे.त्यामुळे पुण्याला जोडणारी शहरे मेट्रोच्या जाळ्याने जोडली पाहिजेत,असे ते म्हणाले.