शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (14:53 IST)

पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर त्याने स्वतःला पेटवले

पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ एका इसमाने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची खळबळजनक घटना घडली.सुरेश विठ्ठल पिंगळे(रा.खडकी)असे या तरुणाचे नाव आहे.या व्यक्तीने स्वतःला पेटवले बघून गेटवर गोंधळ उडाला.या इसमाला पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि गुन्हे शाखेतील पोलिसांनी अडवून आग विझवली.त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 
 
सुरेशला परदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी पासपोर्ट काढला होता.मात्र त्याच्यावर काही गुनाह दाखल असल्यामुळे पासपोर्ट रिजेक्ट करण्यात आला होता. चारित्र्य पडताळणीसाठी होणाऱ्या त्रासाला वैतागून त्याने हे पाऊल उचलल्याचे समजले आहे.