पुणेकरांनो तुळशीबाग मार्केट आणि महात्मा फुले मंडई उघडणार
पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग मार्केट आणि महात्मा फुले मंडई 5 जूनपासून सुरु होणार आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील सर्व मंडई सुरु होणार आहेत. सम तारखेला एका बाजूची आणि विषम तारखेला दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जाणार आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून 50% दुकाने सुरु होणार आहेत. तुळशीबाग मार्केटमध्ये 318 दुकानं आणि 376 पथारी व्यवसायिक आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने तुळशीबागेची पाहणी केली.
तुळशीबाग कधी सुरु होणार याबाबत महिलांना आणि व्यवसायिकांना उत्सुकता होती. तुळशीबागेतील बाजारपेठ सुरु व्हावी, यासाठी व्यापारी संघटनेने प्रस्ताव सादर केला होता. प्रशासनाने मान्यता दिल्याने आता तुळशीबागेतील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तुळशीबागेत ग्राहकांची सुरक्षितता आणि सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे.