गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 16 जानेवारी 2021 (13:31 IST)

नीलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला : अजित पवार

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने दुष्कर्माचे आरोप केले आहेत तर अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यावरून राजकीय आरोप –प्रत्यारोप सुरू झाले आहे.

 भाजपचे नेते नीलेश राणे यांनीही यामध्ये उडी घेत टि्वटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीत चालले तरी काय? जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे असे त्यांनी टि्वट केले होते. याबाबत उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांना पुण्यात विचारले असता त्यांनी संतापून नीलेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे पुण्यातील सर्किट हाऊस येथे आले होते यावेळी ते बोलत होते.