बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (08:35 IST)

'पुणे' देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला पहिला जिल्हा

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखाच्या वर गेली आहे. त्यामुळे आता पुणे हा देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्र सरकार आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात तब्बल २ लाख ३ हजार ४६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी ४ हजार १६५ रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतर पुणे शहरांनी २ लाखांचा टप्पा पार केला आहे.
 
पुणे शहरात एका महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढली असून ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख होती. तर आता कोरोनाबाधित रुग्णांनी २ लाखांचा टप्पा पार केला असून याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या चाचण्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.