1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (09:09 IST)

पुणे : इराणी चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले

खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची तपासणी करीत असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले. युसुफ अली (वय 24, रा. लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे त्याच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्यात.
 
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, खडक पोलिस ठाण्याचे काही कर्मचारी हद्दीतील सराईत गुन्हेगारांची तपासणी करत होते. यावेळी त्यांना दुचाकी चोरणारा एक आरोपी नातूबाग मैदान या ठिकाणी थांबला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नातूबाग मैदान परिसरात सापळा रचून झडप घालून आरोपीला पकडले.
 
परंतु पोलीस आमदाराच्या हाताला झटका मारून त्याने पळ काढला होता. त्यानंतरही पोलिसांनी काही अंतर पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ असलेल्या दुचाकी विषयी चौकशी केली असता त्यांनी ती शुक्रवार पेठेतील शिंदे आळी परिसरातून चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यानंतर गुन्हा दाखल करून त्याची पोलिस कोठडी घेतली.
 
पोलीस कोठडीत त्याने चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अटकेत असलेला आरोपी हा इराणी असून चेन स्नॅचिंग करण्यासाठी त्याने या दुचाकी चोरल्याचे सांगितले. खडक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे करीत आहेत.