रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : रविवार, 5 डिसेंबर 2021 (18:03 IST)

धक्कादायक ! पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने खाल्ल्या थायराइडच्या 50 गोळ्या

पती सारखे माहेरून पैसे आणायची छळ करायचा कधी घराचे कर्ज फेडण्यासाठी तर कधी कारचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पैसे आण अशी मागणी सतत करत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा . पतीच्या या त्रासाला कंटाळून तिने थायराइडच्या एक दोन नाही तर तब्बल 50 गोळ्या खाल्ल्या. हा धक्कादायक प्रकार आकालावधीत साने चौक चिखली येथे घडला आहे. 
या प्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वृत्तानुसार, या महिलेने आपल्या पती अमोल मारुती भंडारे (37) राहणार साने चौक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अमोल हा सतत आपल्या पत्नीला कारचे आणि घराचे कर्ज फेडण्यासाठी वेळोवेळी माहेरून पैसे आणण्यासाठी दबाब टाकायचा. माहेरच्या लोकांना टोमणे मारायचा .माहेरून पैसे आणत नाही म्हणून रात्री दारू पिऊन तिला शिवीगाळ करत मारहाण करायचा. नेहमीच्या त्रासला ला कंटाळून तिने गुरुवारी थायराइडच्या  50 गोळ्या खालल्या. तिला या घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  पुढील तपास चिखली पोलीस करत आहे.