बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: पुणे , शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (16:19 IST)

शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार

गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्तदरात शिवभोजन उपलब्द करून देण्यात येत आहे. या योजनेला गरजू व्यक्तींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवभोजन केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहे. यामुळे शासनाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरात दररोज असलेली 1 हजार 500 थाळींची मर्यादा वाढविली असून 3 हजार थाळी केली आहे. 
 
सध्यस्थितीत पुणे शहरात 7 ठिकाणी तर, पिंपरी चिंचवडमधील चार केंद्रामधून शिवभोजन दिले जाते. आता शासनाने नवीन केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरीमध्ये शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार आहे.