बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (08:24 IST)

गतवर्षीपेक्षा पवना धरणात दुप्पट पाणीसाठा

मागील सहा दिवस जोरदार बॅटिंग केल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी  पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला फक्त 34.45 टक्के पाणीसाठा होता. आजमितीला धरणात 79.13 टक्के पाणीसाठा धरणात आहे.त्यामुळे पुढील 8 ते 9 महिन्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
 
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो.सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.पवना धरण परिसरात पावसाने सहा दिवस जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.