गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (09:57 IST)

आरक्षणासह १४ मागण्या मान्य, ब्राह्मण समाज संघटनेचा दावा

ब्राह्मण समाजाने आरक्षणासह विविध १५ मागण्यांसाठीआझाद मैदानात केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी १४ मागण्या मान्य केल्याचा दावा ब्राह्मण समाज संघटनेने केला आहे. या आश्वासनांतर १ फेब्रुवारीपासून सवर्ण आरक्षण लागू करण्याचे आश्वासन देत त्याचा फायदा ब्राह्मण समाजाला होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित केल्याची माहिती संघटनेने दिली.
 
याशिवाय ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ सुरू करण्यास संमती दिली. या महामंडळासाठी ५०० कोटींची तरतूद करण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा संघटनेने केला. इतर धर्मांप्रमाणेच ब्राह्मण पुरोहितांनाही ५ हजार रुपये मासिक मानधन देण्यास सरकार तयार आहे. वर्षातील मोजकेच दिवस पौरोहित्याचे काम मिळत असून इतर दिवस पुरोहित बेरोजगार असतात. त्यामुळे सरकारकडून इतर धर्मीयांच्या धर्तीवर मानधन देण्यास मुख्यमंत्री तयार असल्याचे संघटनेने सांगितले.