बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (20:58 IST)

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु होणार

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारी पासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोना विषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांना केली.