गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

९ महिन्याचे नवजात बाळ आणि सोबत काढला ९ किलो वजनाचा ट्यूमर

जे.जे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ९ महिन्यांचं बाळ, त्यासोबत ९ किलो वजनाचा ट्यूमर यशस्वीपणे महिलेच्या पोटातून बाहेर काढण्यास यश आले असून, गर्भवती महिलांमध्ये अशा अडथळ्यांमधून प्रससूती करणे खूप दुर्मिळ असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. यामध्ये बाळ आणि आई दोघे ही सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
पालघरच्या विक्रमगडमधील २५ वर्षीय गर्भवती महिला प्रसूतीसाठी जे.जे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र ही शस्त्रक्रिया कशी करायची? असा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण झाला होता. बाळासह ९ किलोचा ट्यूमर बाहेर काढून महिलेची यशस्वी प्रसूती करायची असे होते. त्यात तिचं हिमोग्लोबिन देखील कमी झाल.  
 
पोट जास्त असल्याने तिला श्वास देखील घ्यायला खूप त्रास होत होता. डॉक्टरांनी प्रयत्न करत तिची प्रकृती स्थिर केली. त्यानंतर, योग्य तपासण्या केल्यानंतर आधी सिझेरियन करुन महिलेची प्रसूती केली आणि नंतर ९ किलोचा ट्यूमर बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे आता आई व बाळ दोघेही उत्तम आहेत.