गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , मंगळवार, 5 जुलै 2022 (07:41 IST)

ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

चालत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन पडल्याने पाच वर्षीय बालकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ध्रुवनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी भैरवनाथ विश्वनाथ शिंदे (रा. बारा बंगला शेजारी, धृवनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित आरोपी दिनकर विश्वनाथ शिंदे (वय: 38) हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरला पाण्याचा टँकर जोडून रस्त्याने जात होता.
त्यावेळी दिनकर शिंदे यांच्या डाव्या बाजूला त्यांच्या शेजारी त्यांचा मुलगा राघव शिंदे (वय 5) हा बसलेला होता.
ट्रॅक्टर चालवीत असतांना रस्त्याच्या परिस्थितीकडे व शेजारी बसलेल्या मुलाकडे दुर्लक्ष करून ट्रॅक्टर चालवीत असतांना हा मुलगा तोल जाऊन खाली पडला. यावेळी हा बालक डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाही. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक दिनकर शिंदे याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.