बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (09:36 IST)

देवी भक्तांवर काळाचा घाला अपघात ५ ठार २० पेक्षा अधिक जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे-वणी फाट्याजवळ दोन टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात नाशिक येथील ५ भाविकांचा मृत्यू झाला. सर्व चांदवड तालुक्यातील केद्राई येथील देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाला, टाकळी येथील राहुलनगरात राहणाऱ्या स्वप्नील कांडेकर यांच्या मुलाच्या जावळाच्या कार्यक्रमानिमित्त कांडेकर कुटुंबिय नातवाईकांसह देवीच्या दर्शनासाठी आयशर टेम्पोतून निघाले होते. महामार्गावरील सर्व्हिसरोडवरुन विरूद्ध दिशेने येणार्‍या वाहनाने त्यांना कट मारत  हुलकावणी दिल्याने टेम्पोचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व टेम्पो थेट महामार्गावर आला होता, याचवेळी महामार्गावरुन जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोची भाविकांच्या टेम्पोला धडक बसली. त्यात चार भाविक जागीच ठार झाले तर, एकाचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर, ३३ जण जखमी झाले आहेत. पिंपळगाव बसवंत येथे ३३ जखमींवर उपचार सुरू असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये ११ महिलांसह ६ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सुशीला सुरेश गवळी (६६), निवृती रामभाऊ लोंढे (७०), शोभा जगन्नाथ सूर्यवंशी (६०), सुदाम पाटनकर (६६), समृद्धी डांगे (६ महिने) जखमी लोकांची नावे : चंद्रकला डांगे, जयश्री खोसे, अनिता नामगे, प्रदीप नामगे, अलका चौधरी, भाग्यश्री जंगे, मीनाक्षी केशव शिंदे (४०), हिराबाई रघुनाथ कांडेकर (६०), मयुरी योगेश चौधरी (५), आशा दत्तू कांडेकर (४७), स्वाती मस्के, कैलास म्हस्के, अंकिता खोसे (१५), कुणाल वाघ (१९), रीतेश पवार (५), गार्गी पाटनकर (४), रूद्र म्हस्के (५), शिवम म्हस्के, दीपा मोनगे (४), शिवाजी आभाळे (४०), जनार्दन सूर्यवंशी (६७), दत्तात्रय कांडेकर, शांताबाई चव्हाण, समर्थ कोतवाल, सोनाली झेंडे, विनिता कांडेकर, कैलास म्हस्के, स्वाती म्हस्के, सुनील पगारे, अनिकेत खोसे, कृष्णाबाई शिंदे, इंदरेश खान, सुंदराबाई कांडेकर, स्वाती गवळी.