गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

दाम्पत्यावर अॅसिड हल्ला, पतीचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई भागात अविनाश विरेंद्रकुमार तिवारी आणि सीमा विश्वकर्मा तिवारी या दाम्पत्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला. या घटनेत पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नी मात्र गंभीर जखमी झाली आहे. सुरूवातीला लिव्ह इन मध्ये रहाणाऱ्या या दाम्पत्याचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच झाला होता. वर्सोवा ब्रिजजवळ ही घटना २९ मे रोजी रात्री अडीचच्या सुमाराला घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
अविनाश आणि सीमा हे दोघेही दहिसर पश्चिम भागात असलेल्या कंदारपाडा भागात असलेल्या दिशा अपार्टमेंटमध्ये राहात होते. बुधवारी हे दोघेही जेवणासाठी वसई येथील किनारा हॉटेलमध्ये गेले होते. तिथून परतत असताना रात्री दोन ते अडीचच्या सुमारास या दोघांवर अॅसिड हल्ला केला. वाहनांच्या रहदारीमुळे या दोघांनाही रस्ता ओलांडण्यासाठी वेळ लागत होता. त्याचवेळी एका अज्ञाताने या दोघांवर अॅसिड हल्ला केला.