बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (10:31 IST)

पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरेंची नियुक्ती

पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे पर्यटन, पर्यावर आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. 
 
केंद्र सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांना देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. यासाठी समितीच्या माध्यमातून नावांची शिफारस केली जाते.