गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (16:56 IST)

दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घोटाळा समोर आणणार : सोमय्या

दिवाळीनंतर आणखी एका मोठ्या नेत्याचा घोटाळा समोर आणणार असल्याचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसंच, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवार हे मोठ्या घोटाळ्याचे गुरु असल्याचं सोमय्या म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
दिवाळीनंतर नव्या मुहूर्तावर निश्चितपणे या चाळीस चौरांपैकी आणखी एका चोराच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्र जनतेसमोर ठेवणार असं, किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुरु आहेत असा आरोप केला. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं. ठाकरे आणि पवार हलका गांजा, हर्बल गांजा करत बसलेत. कधी हिरेनला मारण्याची तर कधी आर्यन खानला वाचवण्याची सुपारी दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
 
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पकडलं गेलं. कोर्टाने जेलमध्ये पाठवलं. दहा दिवस यांचं रोज हलका गांजा, हर्बल गांजा हेच चालू आहे. ठाकरे-पवार आणि या सरकारने ड्रग्ज माफियांकडून सुपारी घेतली आहे का? मनसुख हिरेनला मारण्याची सुपारी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी नियुक्त केलेले गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, शिवसेनेचे उमेदवार प्रदिप शर्मा आणि सचिन वाझेंनी घेतली होती, असा आरोप सोमय्या यांनी केला. या सुपारीबाज लोकांना आम्ही रस्ता बदलू देणार नाही, कारवाई होणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.