शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (15:53 IST)

“जेव्हा एका माथेफिरुने शरद पवारांच्या कानशिलात लगावली तेव्हा”, आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

जनआशीर्वाद यात्रेत राणे यांच्यासोबत असलेले भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही आता शिवसेनेवर कठोर टीका केली आहे. सिंधुदुर्गात लावण्यात आलेली जमावबंदी राजकीय असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसंच काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती,त्या प्रसंगाची आठवणही शेलार यांनी यावेळी करुन दिली आहे.शिवसेनेला काही जुन्या प्रसंगांची आठवण करुन देताना आशिष शेलार म्हणाले,आज त्यांच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ते माननीय शरद पवार साहेब यांच्या कानशिलात एका माथेफिरुने मारल्याची दुर्दैवी घटना अख्ख्या देशाने पाहिली.

पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अशी प्रतिक्रिया दिली नाही.आणि हा तर मग केवळ वाक्यातला जर तरचा मुद्दा होता कानशिलात लगावण्याचा.त्याच्यावर जी प्रतिक्रिया दिली ते एका संकुचित मनोवृत्तीचं दर्शन एका संयमित पक्षासोबत राहूनसुद्धा शिवसेनेने केलं आहे.कालही आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना महाराष्ट्रातल्या असहिष्षुतेचे जनक असं संबोधलं होतं.